छत्रपति संभाजी राजे...



"सिहाच्या तोंडात घालुनी हात
मोजितो त्याचे दात
ही आहे आमची जात"..

नाव :संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
जन्म : 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ला पुणे .
मृत्यु : 11 मार्च 1689 तुलापुर , महाराष्ट्र
राज्याभिषेक : 16 जानेवारी 1681
राजब्रीदवाक्य :'श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धौरीव           राजते, यंदकसेविनी लेखवर्तते कस्य नोपरी '....

  
              शिवाजी राज्यानी आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवले .  सर्व गुण संपन्न शिवाजी राजे यांनी " स्वराज्य " स्थांपन केले .  स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य , स्वशासन .
  
   शिवाजी महाराजयांच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केलि ।
संभाजी महाराज यांची शिकवण " मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही . असा छावा होते आमचे राजे ...
पराक्रमाने भरपुर असे संभाजी महाराजांनी बऱ्याच किल्ल्यांवर कूच करुन किल्ले जिंकले .


* औरंगजेबाची दख्खन मोहीम*

औरंगजेबचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे संभाजीच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. .
मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय.

औरंगबच्या सरदारला असा विश्वास होता की आपण रामशेज किल्ला सहज जिंकू शकतो. परंतु, संभाजी महाराजांनी तो किल्ला तब्बल साड़े सहा वर्षे लढवला.

संभाजी महाराजांच्या विषयीचे एक वाक्य
"जो आमच्याशी वाटमारी करेल
आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन
त्याची वाट लावल्या शिवाय
आम्ही आमच्या वाटेवर येत नाही"
हा इतिहास आहे आमचा.

महाराजांच्या इतिहास खुप मोठा आणि पराक्रमाने सजलेला  आहे .   म्हणून ते आज पण आमच्या मनावर राज्य करतात .
महाराजांना मानाचा मुजरा .
जय भवानी। जय शिवराय ।।
जय भवानी। जय शंभुराजे ।।

Comments

Popular posts from this blog

Facts of Human Brain

विश्वास आणि प्रेम